
बेळगाव : सुय कर्नाटक तायक्वांदो संघटनेशी संलग्न असणार्या साई तायक्वांदो काकतीच्या तायक्वांदोपटुंनी राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत अभिनंदन यश संपादन केले आहे.
दावणगिरी येथे गेल्या 16 व 17 एप्रिल रोजी आयोजित राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत काकती येथील साई तायक्वांदोच्या तायक्वांदोपटुंनी दोन सुवर्ण आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. सदर स्पर्धेच्या 17 वर्षाखालील गटात निकिता सुतार हिने प्रथम क्रमांकासह सुवर्ण तसेच ज्योतिबा नागवाडेकर यांनी 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्ण, तर ओम सुरेकर याने 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कांस्य पदक मिळविले. या तिघाही जणांना साई तायक्वांदोचे प्रशिक्षक विनायक राजू केसरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल वरील तायक्वांदोपटुंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta