बेळगाव : पावसाळाच्या सुरुवातीला बेळगाव शहरात अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघाल्या होत्या. त्या अनुषंगाने खरवडलेल्या जमिनीसाठी मोबदला शासनाकडून मिळणार होता. मात्र या मदतीमधून काही शेतकऱ्यांची कागदपत्रे व्यवस्थित नसल्यामुळे शासकीय मदतीपासून वंचित होते. मात्र आता या शेतकऱ्यांना देखील मोबदला मिळणार आहे. बेळगाव शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
बेळगाव शिवार विभागात जून महिन्यात जोरदार अतिवृष्टी होऊन एकाच दिवसी जवळपास 200 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस कोळसला होता. या पावसात बेळगाव शिवारातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरवडून निघालेल्या होत्या.
आमदार अनिल बेनके, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर, कृषिअधिकारी आर. बी. नायकर पाहणीत नुकसान भरपाई देण्याची ग्वाही देण्यात आली होती, त्यानुसार शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आले होते, ते कागदपत्रे सोमवारी सकाळी 11 वाजता कचेरी गल्ली येथील कृषी कार्यालयाचे अधिकारी आर. बी. नायकर व बेळगाव कृषी अधिकारी वज्रश्वरी कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खन्नूकर उपस्थित होते.