जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना खानापूर युवा समितीच्यावतीने निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका व मुसळधार पाऊस पडणार तालुका आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक शाळा इमारतीची दुरूवस्था झाली आहे. अनेक शाळा इमारतीची पडझड झाली आहे. काही ठिकाणी नविन शाळा इमारतीचे काम संथगतीने चालू आहे. तर काही ठिकाणी शाळा इमारतीचे काम बंद आहे. त्याचबरोबर तालुक्यात शाळांमध्ये शिक्षकांच्या भरतीचे काम रखडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोना काळात शाळा बंद आहेत. पारवाड, चिगुळे, चिखले, सडा, चोर्ला, मान हुळुंद, हेमाडगा आदी भागातील विद्यार्थ्यांना वर्षभर ऑनलाईन आभ्यास दिला जात आहे. परंतु या जंगल भागात रेंज येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना प्रश्न पडला आहे. यासाठी योग्य ती योजना करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष परशराम नवलकर तसेच किशोर हेब्बाळकर, अनंतराव झुंजवाडकर, ज्ञानेश्वर सनदी, गोपाल पाटील, संकल्प शिंदे, राजू पाटील, गजानन देसाई, मिलिंद देसाई, विशाल बुवाजी, रणजीत पाटील, भरमा पाटील, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, गोपाळ कुट्रे, नामदेव पाटील, ईश्वर देगावकर, विलास देसाई आदी उपस्थित होते.
Check Also
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भेटीचे जनतेला जाहीर निमंत्रण
Spread the love बेळगाव : स्वामी विवेकानंद यांनी 16 ऑक्टोबर 1892 पासून सलग तीन दिवस …