बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतली होती असे तपासात पुढे आले आहे.
मंत्री ईश्वरप्पा यांचा राजकीय बळी घेतलेल्या कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगावात आलेल्या उडुपी पोलिसांच्या पथकाने आज पाचव्या दिवशीही तपास सुरूच ठेवला. मृत संतोष पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर आणि ग्रा. पं. सदस्य व उद्योजक एन. एस. पाटील यांनी घेतली होती, ती का घेतली होती असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta