बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते पार पडले. या कार्यक्रमात जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी बोलताना न्यायाधीश सी. एम. जोशी म्हणाले, वकिलांनी अनेक याचिकांमध्ये यश मिळविले असेल, किंवा अपयश मिळविले असेल. परंतु हे सर्व आपल्या व्यवसायाशी निगडित असून या दोन्ही गोष्टींचा समानतेने स्वीकार करावा, असे आवाहन केले. बार असोसिएशनच्या वतीने दरवर्षी असे कार्यक्रम राबविले जातात. आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करून प्रोत्साहन देण्याचे उत्तम काम बार असोसिएशन करत असल्याचे सी. एम. जोशी म्हणाले. न्यायाधीश सी. एम. जोशी पुढे बोलताना म्हणाले, सुट्टीवर जाण्यापूर्वी आपण सार्यांनी काही वेळ एकत्रित घालविणे हे अत्यंत सुखद असे आहे. आपल्या क्षेत्राप्रमाणेच इतर क्षेत्रातील मान्यवरांसोबत काही वेळ घालविण्याची संधी मिळाली. आपण सारे एकाच कुटुंबाप्रमाणे आहोत याची आठवण अशा कार्यक्रमात होते. जसे आपण आपल्या क्षेत्रात वकील, न्यायाधीशाची भूमिका पार पाडतो त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात देखील मान्यवर व्यक्ती कार्यरत असतात. आपण सार्यांनी मिळून न्यायदानाच्या प्रक्रियेत हातभार लावतो हे मात्र विसरता काम नये, असेही सी. एम. जोशी म्हणाले.
या कार्यक्रमास बेळगाव वकील संघाचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, प्रधान सचिव गिरीश पाटील, नगरसेवक हणमंत कोंगाले आदींसह जिल्ह्यातील न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …