Saturday , October 19 2024
Breaking News

आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश : आमदार अनिल बेनके

Spread the love

बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके पुरस्कृत महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश समोर ठेवुन आमदार अनिल बेनके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राज माता जिजाऊ, भारतमाता व कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, सामाजिक माध्यमातुन महिलांच्या कलागुणांना वाव देणे, महिलांना कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करणे, कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिला मंडळातील महिलांना एकत्र आणणे, वेगवेगळ्या खेळातुन त्यांना भाग घेण्याकरिता प्रवृत्त करुन त्यांचे मनोरंजन करणे, उत्सफुर्त बक्षिसांच्या माध्यमातुन त्यांचे मनोबल वाढविणे, प्रत्येक विभागात मनोरंजनात्मक कार्यक्रमातुन आनंदीदायक वातावरण निर्माण करणे अशा दृष्टीकोनातुन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वार्डामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रम राबविणे, वार्डामधील महिलांकरिता शारिरिक व बौध्दीक खेळाचे नियोजन करणे, मनोरंजनात्मक खेळात भाग घेणार्‍या महिलामधुन तिन जिंकलेल्या महिलांची निवड करणे, जिंकलेल्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिस देऊन त्यांचे कौतुक करणे असे या कार्यकमांतर्गत उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर रिंग खेळ, बलुन खेळ, लिंबु चमचा, कप खेळ तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना अनेक मनोरंजनात्म खेळ खेळविण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमावेळी प्रत्येक वार्डातील 10 महिलांना शिलाई मशीन देण्यात येणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये पार पडला असून यासाठी इच्छुक महिलांनी आपली नांवे द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *