Monday , September 21 2026
Breaking News

गर्लगुंजीच्या यात्रोत्सव काळात वीजपुरवठा, बससेवा सुरळीत ठेवा; निवेदनाद्वारे मागणी

Spread the love


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या लक्ष्मी मंदिर व मऱ्याम्मा मंदिराच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा, मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा, तसेच गर्लगुंजी गावाचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा अशा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच बससेवा सुरळीत ठेवावी. अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी गावच्या पंचमंडळी व ग्रामस्थांनी हेस्काॅम खात्याला व बसडेपो आगाराला देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे. की, येत्या ३ मे पासून १३ मे पर्यत गर्लगुंजी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ३ मे रोजी लक्ष्मी देवी व मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची गावातुन वाजत गाजत मिरवणूक, ५ मे रोजी दोन्ही मंदिराची वास्तू शांती, दि.६ मे रोजी मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा व कळसारोहण व दुपारी महाप्रसाद होणार आहे. दि. ७ मे रोजी दोन्ही देवीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम, होणार आहे.
त्यानंतर दि. १० मे ते १३ मे पर्यंत माऊली देवीचा यात्रोत्सव साजरा होणार आहे.
तेव्हा या काळात गर्लगुंजी परिसरात वीज पुरवठा सुरळीत ठेवा असे निवेदन हेस्काॅम खात्याच्या अभियंत्या सौ. कल्पना तिरवीर, तसेच याकाळात बससेवा सुरळीत ठेवा अशा मागणीचे निवेदन खानापूर बस डेपो आगारचे व्यवस्थापक महेश यांना देण्यात आले

निवेदन देताना माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, ग्राम पंचायत सदस्य हणमंत मेलगे, परशराम चौगुले, प्रसाद पाटील, अजित पाटील, तसेच गावचे युवा कार्यकर्ते भरत गोरे, बाळू वडेबैलकर व इतर उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्विकार करून सेवा सुरळीत करू असे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *