बेळगाव (वार्ता) : आपल्या अधुदृष्टीवरमात करीत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी श्रेयस महांतेश पाटील याचा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी सन्मान करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
श्रेयस पाटील याला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत अवघी 20 टक्के दिसते. मात्र, त्यावर मात करीत त्याने चांगला अभ्यास करून दहावीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत तो 86.40 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला.
आपल्या अंधुक दृष्टीचा आणि बदललेल्या परीक्षा पद्धतीचा बाऊ न करता श्रेयसने कठोर मेहनत घेत हे यश संपादन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल भाजप ओबीसी राज्य मोर्चाचे सचिव आणि विमल फौंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी श्रेयसचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.
श्रेयसने आपल्या अधू दृष्टीवर मात करून मिळविलेले यश इतरांसाठी आदर्शवत आहे, असे किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी जाधव यांनी श्रेयसला पुढील शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta