बेळगाव : निवृत्त नौदल कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या द नेव्ही बँड कंसर्ट कार्यक्रमात उत्तम सादरीकरण करून नेव्ही बँडने उपस्थितांची मने जिंकली.
आर. पी. डी. कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या नेव्ही बँड कार्यक्रमात पंचवीसहून अधिक वादक सहभागी झाले होते. प्रारंभी राष्ट्रगीताची धून वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकाहून एक सरस धून वाजवून उपस्थितांची नेव्ही बँडने उपस्थितांची मने जिंकली. बॉलिवूड चित्रपटातील काही गाणी, काही इंग्रजी धून आणि अन्य धून वाजवून बँडने उपस्थितांना एक वेगळ्या रविवारचा अनुभव मिळवून दिला.
उत्तर विभागाचे आयजीपी सतिषकुमार, प्रादेशिक आयुक्त आदित्य आम्लन विश्वास, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, एअर कमोडोर एस. डी. मुकुल, किरण ठाकूर आणि विनायक लोकूर आदी मान्यवर कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निवृत्त नौदल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील, सचिव राजीव साळुंखे आणि कार्यक्रमाचे समन्वयक अनिल इस्लामपूरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta