Tuesday , March 3 2026
Breaking News

शांताई वृध्दाश्रमाला जिल्हाधिकारी हिरेमठ यांची भेट

Spread the love


बेळगाव : जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी विविध समारंभात त्यांना मिळालेल्या असंख्य शाली वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना देऊन त्यांच्यासोबत जेवण करून काही काळ आनंदाने घालविला.
बामणवाडीतील समाजसेवक व माजी महापौर विजय मोरे चालवीत असलेल्या शांताई वृध्दाश्रमाला सोमवारी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांनी विविध समारंभात त्यांना मिळालेल्या असंख्य शाली वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भेट दिल्या. पत्नी तनुजा हिरेमठ यांच्यासोबत तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत जिल्हाधिकार्‍यांनी जेवण करून काही काळ ज्येष्ठांसमवेत व्यतीत केला. जिल्हाधिकारी हिरेमठ व त्यांच्या पत्नी तनुजा यांचे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी अत्यंत प्रेमाने स्वागत करून गप्पा मारल्या. त्यांच्यासमवेत पुरणपोळीचे जेवण करून आनंद लुटला. तत्पूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नी तनुजा यांनी स्वत: स्वयंपाक घरात जाऊन पुरणपोळी बनवून तेथील महिलांना स्वयंपाकाला हातभार लावत आपला साधेपणा दाखवून दिला.
यावेळी वृध्दाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी जिल्हाधिकारी हिरेमठ यांना वृध्दाश्रमाच्या उपक्रमांची माहिती दिली. दानशूरांच्या सहाय्याने वृद्धाश्रमाची वाटचाल व्यवस्थित सुरु आहे. समाजातील अनेकांचे सहकार्य याकामी लाभते आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी विजय मोरे आणि त्यांच्या सहकार्‍यांची प्रशंसा केली.
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *