
बेळगाव : बसव जयंतीनिमित्त भाजपा कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बसवेश्वर सर्कल येथे विशेष पूजन करण्यात आले.
तसेच जनतेला संबोधित करताना श्री. किरण जाधव यांनी गुरू बसवण्णांच्या शिकवणीचे स्मरण केले. ज्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि अध्यात्मिक समस्यांचे निराकरण करून शोषित आणि दलितांचे उत्थान करून त्यांना मुख्य प्रवाहात आणून लोकशाही मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती केली. यावेळी श्री. राजन जाधव, शिवकुमार मल्लकनवर, श्री. चेतन नंदगडकर, श्री. विकास प्रभू, श्री. अभिषेक वेर्णेकर, श्री. अक्षय साळवी, हिरालाल चव्हाण, संतोष होंगल आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta