बेळगाव : शिवजयंती मिरवणुकीसाठी चित्ररथ महामंडळाने समस्त शिवप्रेमी कार्यकर्त्यांना शिस्तबध्द मिरवणुकीचे आवाहन केले आहे. मिरवणुकीसाठी असंख्य कार्यकर्ते गेल्या पंधरा दिवसापासून परिश्रम घेत आहेत. शिवजन्मापासून ते राज्याभिषेकपर्यंत इतिहास या मिरवणुकीद्वारे उलगडणार आहे.
शिवजयंती उत्सव मंडळाने दुपारी 4 वाजेपर्यंत भावे चौकात येण्याचा प्रयत्न करावा. मिरवणूक वेळेवर सुरू करून नागरिकांना चित्ररथ देखाव्याचा आनंद घेण्याची संधी दिली जावी हा महामंडळाचा प्रयत्न आहे. मिरवणूक शिस्तबद्धरितीने पार पाडून अनुचित प्रकार टाळण्यासाठी महामंडळाचे 100हुन अधिक स्वयंसेवक मिरवणुकीत कार्यरत राहतील महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, उपाध्यक्ष राहुल जाधव, शरद पाटील, मेघन लंगरकांडे, प्रसाद मोरे, विनायक बावडेकर, प्रशांत भातकांडे, संतोष कणेरी आदींनी हे आवाहन केले आहे. मिरवणुकीत जनसामान्यांना काही अडचणी आल्यास 9964370261 वर संपर्क साधावा