
कागवाड : विश्वगुरु जगत् ज्योती श्री बसवेश्वर जयंती व अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कागवाड येथे विविध कार्यक्रम झाले. माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. बैलांची पूजा, बसवज्योतीचे पूजन व बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण असे कार्यक्रम झाले.
आमदार पाटील यांनी बसवेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यानंतर बसव युवक मंडळाला श्रीमंत पाटील फाउंडेशनतर्फे साऊंड सिस्टम भेट देण्यात आली. यावेळी बसव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांचा यथोचित सत्कार केला. तालुका पातळीवरील सर्व खात्याचे अधिकारी, परिसरातील अनेक गावांमधील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta