
बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर हे होते. सभेमध्ये पुढील अडीच वर्षासाठी चेअरमनपदी जोतिबा गोविंद कालसेकर व व्हाईस चेअरमनपदी प्रकाश नागेंद्र सायनेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी चेअरमन श्री. संजय मासेकर व सर्व संचालक मंडळाने नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. सभेला संचालक बाळासाहेब पावले, नेताजी गोरल, बाळासाहेब कंग्राळकर, पुंडलिक कंग्राळकर, बाळासाहेब देसाई, संजय हूव्वान्नावर, विष्णू मासेकर, शांता मासेकर, शालिनी देसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta