
माजी मंत्री रमेश जारकीहोळी : अथणी येथे माध्यमांशी बोलताना केले भाकीत
अथणी : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी मिळण्याचे भाकीत माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी केले. गुरुवारी ते अथणी तालुक्याच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील, शीतल पाटील, आप्पासाहेब अवताडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जारकीहोळी म्हणाले, सन 2023 ची विधानसभा निवडणूक सध्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली होणार असून मुख्यमंत्री बदलाचे कोणतेही वारे नाही. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येण्यात आम्हा सर्वांबरोबरच माजी मंत्री व आ. श्रीमंत पाटील यांचा देखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांबद्दल लवकरच गोड बातमी मिळणार आहे, असे सांगून त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याच्या चर्चेला दुजोरा दिला.
पीएसआय नोकर भरती घोटळ्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, विरोधी पक्षाने आपल्या लिखित काही असेल तर ते दाखले हजर करावे कुणीही मोठी व्यक्ती असो चूक असल्यास त्याच्यावर कारवाई होणारच असे त्याने स्पष्ट सांगितले.
गोकाक येथे लवकरच अहिंद समावेश करणार असून त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रण देणार आहे याविषयी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, मंत्री पदापेक्षा मला पाणी योजना महत्त्वाची आहे. आपल्या मतदार संघातील पाणी योजनेसाठी अधिकाधिक अनुदान मिळविण्यावर आपला भर आहे. खिळेगाव बसवेश्वर पाणी योजना पूर्ण करून या भागातील दुष्काळी गावे सुजलाम सुफलाम करणे, हेच माझे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केएमएफचे आप्पासाहेब आवताडे, शीतल पाटील, नानासाहेब आवताडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta