
बेळगाव : भगवंताच्या कृपे बरोबरच समाजहितासाठी शंकराचार्यांची विचारसरणी आणि तत्त्वे पूरक आहेत, अशी प्रतिपादन बेळगावचे उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर धोरण आणि कन्नड व संस्कृती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी बसवराज कट्टीमणी सभा भवन येथे आयोजित श्री शंकराचार्य जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आ. बेनके म्हणाले, हिंदू धर्म हा शांतता, सहिष्णुता, संघटन आणि मानवता या तत्त्वांची जाणीव करून देणारा आहे.संत शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले. काश्मीर ते कन्याकुमारी भ्रमण करताना, शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी तन्मयतेने काम केले. त्या काळात शंकराचार्यांनी जी उदात्त तत्त्वे मांडली आणि प्रसारित केली ती आजही समाजासाठी मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी दूरचित्रवाणी कलाकार श्रीरंगा जोशी यांनी प्रार्थना, आणि भक्तिगीत सादर केले. कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालक विद्यावती बजंत्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, गुरुराज जोशी, बी.आर. पाटील, व्यंकटेश कुलकर्णी, पद्मजा कुलकर्णी, उमा देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta