Monday , September 21 2026
Breaking News

मराठा समाजातर्फे राजर्षी शाहु महाराजांना अभिवादन

Spread the love


बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या मेलगे गल्लीतील नवीन इमारतीत शुक्रवारी राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त अभिवादन व मौन कार्यक्रम पार पडला. मंडळाचे सदस्य के.एल. मजूकर यांनी श्री शाहु प्रतिमेचे पूजन केल्यानंतर सर्वानी मौनव्रत पाळून अभिवादन केले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष प्रकाश मरगाळे, ईश्वर लगाडे, नारायण पाटील, विजय जाधव, गणेश दड्डीकर, महेश जूवेकर, सौ. कविता देसाई, राजू मरवेसह इतर हजर होते.

श्री तुकाराम बँकेत राजर्षी छत्रपती शाहुराजे जयंती


शुक्रवार दि. ६/५/२०२२ रोजी लोकराजे छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त शहापूर मधील श्री तुकाराम बँकेत सकाळी दहा वाजता बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगळे, नारायण पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करुन नंतर सर्व कर्मचारी व इतरांनी १०० सेंकद मौन पाळून अभावादन करण्यात आले. यावेळी संचालक राजू मरवे, एपीएमसी सदस्य महेश जूवेकर, गणेश दड्डीकर, व्यवस्थापक परिंद जाधवसह इतर कर्मचारी हजर होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *