
बेळगाव : बेळगावात नुकतेच सुरु करण्यात आलेल्या बेळगाव दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजू टोपन्नावर यांनी केला आहे. बेळगाव येथील साहित्य भवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना आम आदमी पक्षाचे उत्तर कर्नाटक प्रभारी राजू टोपन्नावर म्हणाले, बेळगाव दक्षिण विभाग उपनोंदणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. वरिष्ठ अधिकारी यातले काहीही माहित नसल्याचा आव आणून मौन पाळून बसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उपनिबंधक कार्यालयातील भ्रष्टाचाराची सर्व पुरावे, कागदपत्रे आमच्याकडे आहेत, लवकरच ते प्रसारमाध्यमांसमोर उघड करू असे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta