Wednesday , March 4 2026
Breaking News

राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा बेळगावात समारोप शानदार समारोप….

Spread the love

बेळगाव : बेळगावात रविवारी विजयनगर प्रांतातील राष्ट्रसेविका संघाच्या घोष वर्गाचा समारोप समारंभ पार पडला. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार पथ संचलन पार पडले.

बेळगाव येथील अनगोळमधील संत मीरा शाळेच्या प्रांगणात राष्ट्रसेविका समितीच्या विजयनगर प्रांताच्या घोष वर्गाचा समारोप सोहळा रविवारी आयोजित केला होता. यानिमित्त राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांचे अनगोळ भागात शानदार पथ संचलन पार पडले. राष्ट्रसेविका संघाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी होऊन शिस्तबद्ध संचलन सादर केले. यावेळी सेविकांनी हाती ध्वज घेऊन, विविध वाद्यांसह आकर्षक पंथ संचलन केले. अनगोळमधील संत मीरा विध्यालयापासून सुरु झालेले हे संचलन सायप्रस ओक बिल्डिंगपासून, अभिषेक स्पोर्ट्सकडून उजव्या बाजूला वळून बिग बझार, आरपीडी यू टर्न, भांदुर्गे मेडिकल्स, इंडियन बँक डावीकडे वळून धनश्री गार्डन मार्गे संत मीरा शाळेच्या आवारात येऊन संचलनाची सांगता झाली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट जोसेफ टीटीआय बेळगावचे डॉ. शैलजा सुधीर कुलकर्णी होत्या. मुख्य कार्यवाहिका सीता गायत्री, वर्गाधिकारी वीणा हेगडे, प्रांत कार्यवाहिका वेदा कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रसेविका समितीच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *