Sunday , July 26 2026
Breaking News

घरातील महिलांचा सन्मान करणे हिच खरी लक्ष्मीपूजा : तपोरत्न रघुवीर गुरूजी

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महाराष्ट्र ही अध्यात्माची भूमि आहे. येथे घराघरात लक्ष्मी पूजन केले जाते पण यापेक्षा घरातीत सर्व महिलांचा कोणताही वाद -भांडण न करता सन्मान केल्यास तीच खरी लक्ष्मीपूजा ठरेल असे विचार जय संतोषी माता कालिका माता आश्रम कुंगिनीचे तपोरत्न
रघुवीर गुरूजी यांनी व्यक्त केले.
आज म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे भक्तीमय वातावरणात कार्यसम्राट आमदार राजेश पाटील साहेब व सौ. सुस्मिता पाटील यांच्या शुभ हस्ते लक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी जय संतोषी माता आश्रम कुंगिनीचे स्वामी तपोरत्न रघुवीर गुरजी यांचा शुभ हस्ते मंदिराचा कळसारोहन समारंभ संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री रघुवीर स्वामी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सी. ए. पाटील होते.

तपोरत्न रघुवीर स्वामी पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्र ही महालक्ष्मीची भूमी आहे. येथे लक्ष्मीची मंदिरे उभारून अध्यात्म जपला जातोय हि चांगली गोष्ट असली तरीही प्रत्येक घरातील भांडण बाजूला सारून महिलांचा सन्मान केल्यास तीच खरी लक्ष्मी पूजा ठरेल.
अध्यात्माशिवाय पर्याय नसून जीवन सुखी बनवायचे असेल तर ईश्वराची संगत करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.
यावेळी म्हाळेवाडी लक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कमिटी सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी, तरूण मंडळ, बचत गट, भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिनोळीत पाद्यपूजन सोहळा उत्साहात साजरा

Spread the love  चंदगड (प्रतिनिधी) : शिनोळी बुद्रुक येथे विद्या चेतना प्रकल्पांतर्गत शिनोळी बु. येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *