संकेश्वर (प्रतिनिधी) : चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी हे काॅंग्रेसच्या नेते मंडळींवर कमालीचे नाराज दिसत आहेत. आपण लवकरच काॅंग्रेसला रामराम करुन कन्नड संघटना बळकट करणार असल्याचे ते सांगताहेत.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, संकेश्वरात काॅंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्याऐवजी ती खिळखिळी करण्याचे कार्य केले जात आहे. पक्षाचा कोणताही निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. माजी मंत्री ए. बी. पाटील हे तिघांच्या सांगण्यावरून राजकारण करताहेत. त्यामुळे संकेश्वरात काॅंग्रेस पक्ष संघटना मजबूत होईनासी झाली आहे. संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ उमेदवार निवडतांना देखील आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही. आपल्याला पक्षात डावलण्याचे कार्य केले जात आहे. त्यामुळे आपण कंटाळलो आहे. काॅंग्रेस पक्षात आपल्याला किंमत नसेल तर राजीनामा देणेच योग्य ठरणार आहे. आपण लवकरच काॅंग्रेसला रामराम करुन कन्नड संघटनेचे कार्य हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta