बेळगाव : शेतकर्यांना सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात यावा. कृषी कर्जाव्यतिरिक्त गृहकर्ज, सोने तारण कर्ज, वाहन कर्ज आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सुचना राज्यमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना सोमशेखर म्हणाले, डीसीसी बँकेने शेतकऱ्यांना 100% कर्ज दिले पाहिजे. कर्ज देण्यात बेळगाव जिल्हा राज्यात पहिला आहे. पुढील काळात ही कर्ज वाटपासाठी वार्षिक लक्ष्य निश्चित करुन प्रगती साधावी. व्याज सवलत योजना सर्व शेतकर्यांमध्ये समान रीतीने दिली जावी. नवीन शेतकर्यांना डीसीसी बँकेकडून कर्ज वाटप करण्यात यावे, असे ते म्हणाले.
कोविडच्या बाबतीत डीसीसी बँकेची भूमिका महत्त्वपूर्ण राहीली आहे.कठीण काळात, डीसीसी बँकने मुख्यमंत्री मदत निधीला रु. 2 कोटी. चिक्कलगुड्ड गावात रूग्णांच्या फायद्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये खर्चून ऑक्सिजन युनिट स्थापन केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. बँकिंग व्यवसायासाठी वापरल्या जाणार्या सॉफ्टवेअरच्या वापराबाबत कोणतीही अडचण आल्यास ती त्वरित दूर केले जावी.
डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, उपाध्यक्ष, सहकार विभागाचे अधीक्षक, नियामक मंडळाचे सदस्य व नियामक मंडळाचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते.