बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मुत्नाळ, सिद्धनभावी, हलगीमर्डी, नागेरहाळ, कमकारट्टी आदी गावांमध्ये बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला सु. अंगडी यांच्या अमृत हस्ते जल जीवन मिशन योजनेला चालना देण्यात आली.
याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मोदींचे स्वप्न आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडून 37.5 टक्के, राज्य सरकारकडून 37.5 टक्के तसेच ग्रामपंचायतीकडून 15% टक्के व जनतेकडून 10% अशी ही योजना राबविण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या प्रतिनिधी श्रीमती मंगला अंगडी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नातून प्रत्येक घराला ही पाण्याची सुविधा मिळत आहे. तेव्हा संबंधित अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, ग्रामपंचायत सदस्य, गावातील मंडळांनी लक्ष देऊन लवकरात लवकर उत्कृष्ट दर्जाचे काम होऊन प्रत्येक घराला पिण्याचे पाणी मिळावे असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती मंगला अंगडी म्हणाल्या, केंद्र सरकारच्या आशीर्वादाने तसेच मोदींच्या आशीर्वादाने प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे. या योजनेसाठी आणखी निधी कमी पडल्यास संबंधित खात्याकडून आम्ही द्यायला लावू पण एकाही घराला नळजोडणी झाली नाही असे होता कामा नये, तेव्हा सर्वांनी लक्ष देऊन योजना पूर्णत्वास न्यावी अशी खासदारांनी सूचना दिली.
जलजीवन मिशन योजने अंतर्गत संबंधित काही अधिकार्यांनी चुका केल्याने ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी त्या अधिकार्यांना चांगलेच खडसावले. पुन्हा अशी चूक झाल्यास खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी ग्रामीण मंडळ सरचिटणीस बसवराज दमनगी, सिद्धाप्पा हुकेरी, सिद्धया हिरेमठ, माणिक अमट्टूर, मोहन अंगडी, आदिंसह प्रमुख कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …