Sunday , September 20 2026
Breaking News

आजर्‍याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाजवळ सापडली मानवी कवटी

Spread the love

आजरा : आजर्‍याजवळील रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर मानवी कवटी सापडली आहे. विजेच्या डांबाच्याखाली असणारी कवटी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे.
सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना विजेच्या खांबाच्याखाली मानवी कवटी असल्याचे लक्षात आले. दरम्यान रामतीर्थ पर्यटन स्थळाकडे ये-जा करणार्‍या नागरिकांनी ही कवटी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. कवठी कशाची असावी, येथे कोणी आणून टाकली, भोंदूगिरी करण्यासाठी आणली असावी का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
आजरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या कवटीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू असून या कवटीची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

Spread the love  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *