

बेळगाव : सकल मराठा समाजाच्यावतीने रविवार दि. 15 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते विविध भागात जनजागृती करत आहेत. सदर कार्यक्रमासाठी बेळगावसह खानापूर, संकेश्वर, निपाणी आदी भागातून मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यामुळे बेळगावात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात गोसावी मठाचे मठाधिश श्री मंजुनाथ स्वामीजींच्या शोभायात्रेने करण्यात येणार आहे.
यावेळी श्री मंजुनाथ स्वामीजींचा सत्कार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी काशीचे स्वामी नरेंद्र जी हे देखील उपस्थित राहणार आहेत.
दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या कपिलेश्वर तीर्थक्षेत्रासपासून शोभायात्रा चालू होणार असून वडगाव येथील आदर्श विद्या मंदिरच्या पटांगणात कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचा देखील समावेश असणार आहे. संपूर्ण बेळगाव शहर भगवेमय होणार आहे. या कार्यक्रमासाठी आदर्श विद्यामंदिर वडगाव येथे भव्य शामियाना उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तरी समस्त मराठा समाजातील नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta