Saturday , October 19 2024
Breaking News

गुरुवंदना कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद!

Spread the love

बेळगाव : सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवार दि. 15 मे रोजी मराठा समाजाचे जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी यांचा गुरुवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासंदर्भात जनजागृती केली जात असून ग्रामीण पूर्वभागामध्ये बसरीकट्टी, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री, सुळेभावी आदी भागात मराठा भाषिक एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर व इतर समिती नेतेमंडळी कंबर कसली आहे.

गुरुवंदना कार्यक्रमास समर्थनगरचाही पाठिंबा!

समर्थनगर येथेही गुरुवारी सायंकाळी बैठक पार पडली. ब्रह्मदेव मंदिरामध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समर्थनगर येथील पंच वसंत हलगेकर हे उपस्थित होते. त्याप्रमाणे गुरुवंदना कार्यक्रम संयोजक समितीचे महादेव पाटील व राहुल मुचंडी यांच्यासह बाळू पाटील, विनायक कोकितकर, सुरज गायकवाड व निखिल बराले हे व्यासपीठावर हजर होते.


बैठकीत बोलताना संयोजक समितीचे महादेव पाटील, राहुल मुचंडी आदींनी गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी समर्थनगर परिसरातील युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, लाख मराठा एक मराठा, सकल मराठा समाजाचा विजय असो! या घोषणा देण्याद्वारे गुरुवंदना कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *