Monday , September 21 2026
Breaking News

सीमाभागातील मराठी संस्थांना अर्थसहाय्य मिळावे

Spread the love


बेळगाव : एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव, अखिल भारतीय प्रगतीशील सामाजिक-सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव तसेच बेळगाव सीमाभागातील मराठी भाषा संवर्धनासाठी कार्यरत विविध संस्थांना आर्थिक सहाय्य करावे, अशा मागणीचे निवेदन माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांना देण्यात आले.
सीमाभागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, संस्कृतिक, वृत्तपत्र, वाचनालय, शाळा व महाविद्यालयातील मराठी विभाग तसेच शैक्षणिक क्षेत्रातील संस्था मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संवर्धन करण्याचे काम सातत्याने करीत आले आहेत. हे कार्य अधिक जोमाने व्हावे यासाठी या संस्थांना आर्थिक पाठबळ मिळावे. महाराष्ट्र सरकारकडून या संस्थांना आर्थिक मदत मिळवून देऊन आपण सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रा. एन. एन. शिंदे, ए. व्ही. सुतार यांच्यासह सदस्यांच्या सह्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *