Monday , September 21 2026
Breaking News

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर “गुरुवंदना”ची जिल्हाधिकार्‍यांनी घेतली माहिती

Spread the love

बेळगाव : आचारसंहिता लागू झाली असली तरी गुरुवंदनाचे प्रचार मोहीम राबवण्यात कोणती अडचण नाही. आचारसंहितेचे पालन करून “गुरुवंदना” कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती किरण जाधव यांच्याकडून घेतली. त्याचबरोबर कार्यक्रमासंबंधी जागृती करणारे फलक आहेत त्यावर राजकीय नेत्याच्या छबी असणारे फलक हटविण्याची सूचना केली. “गुरुवंदना” कार्यक्रमाचे फलक लावण्यात कोणती अडचण नसल्याचे नमूद केले. यावेळी सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव, अनंत लाड, सुनील जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *