बेळगाव : विद्या आधार एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने आज चार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना शांताईचे कार्याध्यक्ष आणि बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला रद्दी यासह कागदे द्यावीत, याद्वारे आम्ही विद्या आधार योजनेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क देऊ असे आवाहन केले.
येथील भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यवस्थापकीय समिती सदस्य विनोद दोड्डन्नावर, भरतेश पु. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता देशपांडे या प्रमुख पाहुण्या होत्या. विद्या आधार एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीचे संचालक विनायक लोकूर, विजय मोरे, संतोष ममदापूर, अॅलन मोरे आणि संतोष दरेकर व्यासपीठावर होते.
यावेळी यश खोत भाऊराव काकतकर महाविद्यालय – 10,000/-, खुशी विजय मोहिते वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल – 5,000/-, प्रेम विजय मोहिते : वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल – 5,000/-
आणि धनश्री भागानगरे : भाऊराव काकतकर कॉलेज – 9,000/- या चार विद्यार्थंना आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी विनायक लोकूर यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वापरलेली वृत्तपत्रे देऊन गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल, असे सांगितले. विनोद दोड्डन्नावर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, त्यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना सहभागी होऊन विद्या आधार मजबूत करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भरतेश महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी नीता नाईक, भारती हलसगी, सूरज सुतार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta