खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी,भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्नी मा.पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवावा याकरिता पाटील मळा कंग्राळी खुर्द येथील नागरकांनी पुढाकार घेत #letter To PM या मथळ्याखाली पत्र मोहिम राबवत उस्फूर्तपणे सहभाग घेऊन सुमारे २०० पत्रे पंतप्रधानांना पाठवली.
“सीमाप्रश्न मार्गी लावून ४० लाख मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करून न्याय द्यावा.” आशा भावना कंग्राळीवासियानी व्यक्त केल्या.
तसेच यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील म्हणाले, हा मराठी भाषिक सीमाभाग कर्नाटकात घातल्यामुळे स्थानिक मराठी तरुणांना येणाऱ्या कोणत्याही सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान नाही, फक्त कानडी लोकांना नोकऱ्या दिल्या जात आहेत, तसेच कन्नड सक्ती केली जात आहे, मराठी संपवण्याचा प्रयत्न कर्नाटक शासन करत आहे. मा. प्रधानमंत्री मोदींनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देवून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.
यावेळी सेजल गुरुनाथ पाटील, नूतन गुरुनाथ पाटील, सुमन परशराम पावशे, अक्षरा गुरुनाथ पाटील, गुरुनाथ रामलिंग पाटील,रेणुका पावशे, लक्ष्मण नारायण पाटील, पार्थ लक्ष्मण पाटील, मेघा लक्ष्मण पाटील, समीक्षा एकनाथ पाटील, वंदना गोविंद गवस, श्रद्धा परशुराम पावशे, नंदा परशराम येळवे, रेश्मा जोतिबा यावे, कल्पना महेश जायन्नाचे, शुभांगी श्रीकांत जायन्नचे, रेखा लक्ष्मण पाटील, संजना शिवाजी नाईक, उर्मिला उमेश जायनाचे, निकिता लक्ष्मण नावगेकर, किरण पाटील, प्रभावती फकीरा पाटील, नम्रता फकीरा पाटील, जोस्ना गुंडुराव नाईक, प्रिया मनोज सुतार, मिलन लक्ष्मण पाटील, सदानंद निलजकर, दीक्षा नारायण सुतार, सुषमा अशोक निलजकर, किरण परशुराम पाटील, शैलेश फकीरा पाटील, आरती अशोक निलजकर, हेमा सदानंद निलजकर, संगीता गुंडेराव नाईक, वर्षा महादेव पाटील, शारदा शिंदे, मानसी महेश जायनाचे, शितल एकनाथ पाटील यांनी पत्र मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कामगिरी बजावली..!