Wednesday , November 12 2025
Breaking News

आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा; आकाश हलगेकर यांचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

बेळगाव : कंग्राळी गल्ली, बेळगाव येथील एक हरहुन्नरी समाजसेवक आकाश हलगेकर आणि मित्र परिवारातर्फे किल्ल्याजवळील झोपडपट्टी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु त्यांच्या चार वर्षांनंतर देखील आपल्या देशातील गरीब आणि गरजूंना स्वातंत्र्य कधी मिळाले तसेच स्वातं समानतेवर आहे, जोपर्यंत आपण प्राप्त करू शकत नाही तोपर्यंत आपण उठत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मोल राखत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
सकाळी झोपडपट्टीतील नागरिक व लहान मुलांच्या उपस्थितीत एका झोपडीवर राष्ट्रध्वज फडकला. यावेळी सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमा असलेले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असलेले फलक दिसत होते. यावेळी लहान मुले व उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले.
झोपडपट्टीत अशा प्रकारचा होणारा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच म्हणावा लागेल. या कार्यक्रमाने सर्वांचे चेहर्‍यावरुन आनंद ओसंडून जात होता.
आकाश हलगेकर यांच्यासह सुनील कोलकार, दीपक केतकर, अमोल चौगुले, विनायक कंपन्नावर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

मच्छे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मच्छे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *