Wednesday , December 10 2025
Breaking News

एसएसएलसी : बेळगाव जिल्हा राज्यात चौथा

Spread the love

6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण
बेळगाव : राज्यभरात घेण्यात आलेल्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, एकूण 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवून विक्रम प्रस्थापित केला आहे. बेळगाव जिल्ह्यात 6 विद्यार्थ्यानी 625 पैकी 625 गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे. निकालात बेळगाव जिल्हा राज्यात चौथा आला आहे.
2021-22 च्या शैक्षणिक वर्षाच्या एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. बेळगाव जिल्ह्याने निकालात राज्यात चौथे स्थान पटकावले आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील एकूण 6 विद्यार्थ्यानी 625 पैकी 625 गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील सत्तीगेरी गावची विद्यार्थिनी सहना रायर, नंदगडच्या संगोळ्ळी रायण्णा स्मृती शाळेची विद्यार्थिनी स्वाती सुरेश तोलगी, रामदुर्गच्या केम्ब्रिज इंग्लिश माध्यम शाळेचा विद्यार्थी आदर्श हालभावी, बेळगावच्या एम. व्ही. हेरवाडकर विद्यालयाचा विद्यार्थी अमोघ कौशिक, रामदुर्गच्या बसवेश्वर इंग्लिश माध्यम शाळेची विद्यार्थिनी रोहिणी गौडर, बेळगावच्या केएलएस इंग्लिश माध्यम शाळेचा विद्यार्थी व्यंकटेश डोंगरे या 6 विद्यार्थ्यांनी एसएसएलसी परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजेच 625 पैकी 625 गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील सत्तीगेरी गावची विद्यार्थिनी सहना महांतेश रायर या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील या अभ्यासू विद्यार्थिनीचे तिच्या शिक्षकांनी तिच्या घरी येऊन अभिनंदन केले. मुलीच्या या यशाने आनंदित झालेल्या तिच्या आई-वडिलांनी अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. सहनाप्रमाणेच बेळगावच्या एम. व्ही. हेरवाडकर विद्यालयाच्या अमोघ एन. कौशिक यानेही एसएसएलसी परीक्षेत 625 पैकी 625 गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे. मुलाच्या यशाने आनंदित झालेले वडील नागसुरेश आणि आई जयश्री यांनी अमोघला मिठाई भरवून त्याचे अभिनंदन केले. अमोघच्या यशाबद्दल त्यांनी आनंदित होऊन प्रतिक्रिया दिली.

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *