Wednesday , April 9 2025
Breaking News

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षपदी  डॉ. सुषमा शेट्टी तर सचिव पदी डॉ. सविता कद्दु यांची निवड

Spread the love

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या २०२१-२०२२ वार्षिक कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी  डॉ.सुषमा शेट्टी तर सचिव पदी डॉ. सविता कद्दु यांची निवड  करण्यात आली आहे. अध्यक्षा व सचिव यांचा पद्ग्रहण समारंभ उद्या १४ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता ऑनलाइन झूम मीटिंगवर होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्षा रत्ना बेहरे यांच्या हस्ते पद्ग्रहण समारंभ होणार आहे. तसेच  इतर कार्यकारिणी अशी आहे. उपाध्यक्षा- शालिनी चौगुले, खजिनदार- तेजस्विनी हजारे, उपसचिव-पुष्पांजली मुक्कनवार, जनसंपर्क प्रमुख-ममता जैन, शर्मिला कोरे, प्रीती चिंडक, लता कित्तुर.

नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी यांनी आजपर्यंत इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या मुख्य कार्यकारिणीवरील विविध पदावर काम केले आहे. इनरव्हीलच्या विविध सामाजिक उपक्रम आयोजनात त्यांचा सहभाग होता.

बेळगावच्या प्रख्यात स्त्री रोग तज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता कद्दु यांची सचिव पदी निवड झाली आहे. यापूर्वी गेली १७ वर्षे त्या वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्य करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या(आयएमए) कार्यकारी मंडळावर त्यांनी काम केले आहे. आयएमए मार्फत राबवल्या जाणाऱ्या अनेक मोफत आरोग्य तपासणी शिबिरात त्या सहभागी असतात. कोरोना काळात देखील त्यांनी जिव्हाळा फौंडेशनच्या माध्यमातून  बेळगावकरांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ अनेक रुग्णांनी घेतला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची वसतिगृहात आत्महत्या…

Spread the love  बेळगाव : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *