युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा
बेळगाव : बेळगावातील लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेळगाव सर्वाधिक प्रभावित झाले होते. त्यामुळे बेळगावला वेगवान लसीकरण होणे गरजेचे होते पण कमी लस पुरवठा आणि लसीकरणात राजकीय हस्तक्षेप यामुळे कित्येक सामान्य नागरिकांना अजूनही लसीचा पहिला डोस मिळाला नाही, तसेच पहिला डोस झालेल्या नागरिकांना आता दुसरा डोस मिळणे सुद्धा गरजेचे आहे, ही लसीकरणातील दिरंगाई दूर करून लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा. तसेच येणाऱ्या गणेशोत्सवात प्रत्येक मंडळामार्फत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी केली.
यावेळी बोलताना तालुका आरोग्यधिकारी डॉ. श्री. एच. एस. मास्तीहोळी यांनी येत्या आठवड्यात लसीचा पुरवठा वाढवून लसीकरण सुरळीत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
या भेटीदरम्यान संतोष कृष्णाचे, मनोहर हुंदरे, अहमद रेशमी, राजू कदम आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta