बेळगाव : केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडो-अमेरिकन प्रेस क्लबने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. न्यूयॉर्क येथे शनिवारी झालेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
उत्तर कर्नाटकात व महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देत समाज आणि राष्ट्र निर्माण कामात योगदान दिल्याची दखल घेत, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
न्यूयॉर्कमध्ये असलेल्या भारतीय दूतावासात प्रेस क्लब ऑफ युएसए यांच्यावतीने हा कार्यक्रम झाला. तेथील कॉन्सुलेट जनरल रणधीर जयस्वाल यांनी पुरस्कार प्रदान केला. माजी महापौर बिल दे ब्लासिओ, भारतीय उद्योजक व न्यूयॉर्क शहर आर्थिक विकास मंडळाचे सदस्य प्याम कात्रा, झेविअर विद्यापीठाचे अध्यक्ष रविशंकर भोपळापूर, प्रसिद्ध कर्करोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय नोरी, इंडो अमेरिकन प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष कमलेश मेहता आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta