बेळगाव : बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पोलीस स्थानकात आणि अमली पदार्थांच्या विक्रीवर बऱ्यापैकी आळा आणताना वेगळ्या ठिकाणी धाडी टाकतात अमली पदार्थ जप्त करण्याची साखळी चालूच ठेवली आहे.
बेळगाव शहरात काल मंगळवारी खडे बाजार आणि सी ई एन पोलिसांनी हेरॉईन विक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड केलं होतं आज बुधवारी हिरे बागेवाडी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या मुसक्या आवळत कारवाई केली आहे.
हिरेबागेवाडीची पोलीस निरीक्षक विजय सिन्नुर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने हलगीमर्डी गावात गांजाचे शेतात उत्पादन करून विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई केली आहे.
बसनगौडा रुद्रगौडा पाटील (वय 66) रा.हलगीमर्डी असे या प्रकरणी अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीं कडून 18000 किमतीचा एक किलो 558 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी शेतात 10 हजार किंमतीचा 1 किलो 220 तर आरोपींजवळ 8 हजार रुपये किंमतीचा 328 ग्राम गांजा जप्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta