बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राइड सहेली यांचा अधिकारग्रहण सोहळा उद्या बुधवार दिनांक 1 जून रोजी दुपारी चार वाजता हिंदवाडी येथील हिंद सोशल क्लब येथे होणार आहे. या कार्यक्रमाला हुबळीच्या फेडरेशन अध्यक्षा तारादेवी वाली, मुंबई येथील सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमिन, यांच्यासह डॉ. सोनाली सरनोबत, राजू माळवदे आणि अनंत लाड आदी उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी प्राइड सहेलीच्या अध्यक्षपदी आरती शहा यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून स्नेहल शहा, द्वितीय उपाध्यक्ष रश्मी पाटील, सचिव जिग्ना शहा खजिनदार मोनाली शहा यांची निवड झाली आहे. वेगवेगळ्या संघ संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या या सदस्यांनी एकत्र येऊन प्राइड सहेली ग्रुपची स्थापना केली आहे.
नूतन अध्यक्ष आरती शहा या कॉमर्स पदवीधर असून, त्या चितळे ग्रुपच्या बेळगावमधील वितरक आहेत. या आधी त्यांनी अनेक सामाजिक कार्यात भाग घेतला आहे. उपाध्यक्ष स्नेहल शहा यांचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले आहे. त्यांनी गुजराती सखी महिला मंडळाची धुरा सांभाळली आहे. तसेच जैन जगृती या संघटनेच्या अध्यक्षा आहेत. सचिव जिग्ना शहा यांचे शिक्षण मुंबईत झाले आहे. या अनेक उपक्रमांत अग्रेसर असतात. अनेक संघटनेत त्या कार्यरत आहेत. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.
Belgaum Varta Belgaum Varta