Wednesday , March 4 2026
Breaking News

येळ्ळूर येथील नाला(पाठ) झाला अतिक्रमण मुक्त व स्वच्छ

Spread the love

बेळगाव : येळ्ळूर येथील सिद्धेश्वर गल्लीपासून सुरु असलेला नाला बरीच वर्षे अतिक्रमण व अस्वच्छ होता. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत होते. हा नाला अवचारहट्टी रोड पासून सुरु होऊन लक्ष्मी तलावाला येऊन मिळतो आणि तेथून तो नाला सिद्धेश्वर गल्लीतून पुढे शेतीतुन जाऊन मच्छे जवळील रेल्वेलाईन पर्यंत होता. पण येळ्ळूर पासून थोड्या अंतरावर हा नाला अदृश्य झाला होता (बुजवण्यात आल्यामुळे पाण्याचा विसर्ग होत नव्हता) त्यामुळे नाल्यातील पाणी व प्लास्टिक, प्लास्टिक बॉटल, ड्रेनेज पाणी शेतात शिरून शेतीचे फार मोठे नुकसान होत होते. या भागातील शेतकारी बरीच वर्षे झाली हा नाला खुला व्हावा, अशी मागणी करत होते. या नाल्याची परिस्थिती शेतकऱ्यांनी ग्राम पंचायत अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेऊन संबंधित खात्याच्या सर्वे डिपार्टमेंट व तलाठी यांना रीतसर अर्ज देऊन संबंधित अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नाल्याची मोजणी करून येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील व ग्राम पंचायत सदस्य यांनी उद्योगखात्री योजनेच्या माध्यमातून नाला खुदाईला आजपासून सुरूवात केली. यावेळी अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, रमेश मेनसे, जोतिबा चौगुले, राकेश परीट, राजू डोण्ण्यानवर, विलास बेडरे, दयानंद उघडे, पिडीओ अरुन नाईक, तलाठी मयूर मासेकर, माजी ग्राम सदस्य बाबूराव मुरकुटे, शिवाजी गोरल, ग्राम पंचायत कर्मचारी, शेतकरी व गावातील नागरिक आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *