बेळगाव : आजपासून दिनांक 4 जून पर्यंत शहरातील उत्तर भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
शहरातील उत्तर भागातील वीज पुरवठा दुरुस्तीच्या कारणास्तव चार दिवस खंडित करण्यात येणार आहे. उत्तर भागात टप्प्याटप्प्याने दुरूस्ती करण्यात येणार असून रोज वेगवेगळ्या परिसरातील विजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय क्लब रोड, काकती वेस, कॉलेज रोड, राणी चन्नम्मा चौक, श्रीनगर, अंजनेय नगर, महांतेश नगर, रुक्मिणी नगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, रामतीर्थ नगर रोड, शिवबसव नगर, धर्मनाथ भवन परिसर, अशोक नगर, कॅन्सर हॉस्पिटल, वीरभद्र नगर, शिवाजीनगर, पोलीस हेडकॉटर, केएसआरटीसी कॉटर्स या भागातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.