बेळगाव : बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारातील बेकायदा खोकी, दुकाने महापालिका अधिकार्यांनी आज हटवली.
बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारातील बेकायदा खोकी, दुकाने हटविण्याची मोहीम आज महापालिका अधिकार्यांनी राबवली. शुक्रवारी सकाळी-सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही मोहीम राबवून सुमारे 15 खोकी काढून टाकली. पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी स्वतःच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवली. यावेळी व्यापार्यांशी चर्चा करताना पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्ट आवारात अशाप्रकारे दुकाने थाटणे बरोबर दिसत नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी यावर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. ही सगळी दुकाने एकाच ठिकाणी व्यवस्थित सुरु करण्याची आणि पार्किंगसाठी व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. त्यामुळे सगळ्यांची योग्य व्यवस्था करण्यात येईल.
यावर व्यापार्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता दुकाने हटविल्यावरून आक्षेप घेतला. त्यावर ही तुमची स्वत:ची जागा नव्हे, सरकारी जागा आहे. तुम्हाला पर्यायी व्यवस्था करून देण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी केली आहे. त्यानुसार व्यवस्था करण्यात येईल अशी व्यापार्यांची समजूत पालिका आयुक्तांनी घातली.
Belgaum Varta Belgaum Varta