बेळगांव : वैवाहिक जीवनात तडजोड केल्यास वाढत्या घटस्फोटाला आळा बसेल, असे प्रतिपादन मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले.
मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत झालेल्या विधवा, विधूर व घटस्फोटितांच्या वधू- वर मेळाव्यात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर, वधू-वर मंडळाचे प्रमुख ईश्वर लगाडे, मोहन सप्रे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वधू, वर व पालकांनी परिचय करून दिला व आपले मनोगत व्यक्त करताना आपले अनुभव कथन केले. यावेळी के. एल. मजूकर यानीही विचार व्यक्त करून प्रत्यक्ष वधू वरांची उपस्थिती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. तर ईश्वर लगाडे वधू वर मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. जी. जी. कानडीकर यांनी स्वागत केले तर मोहन सप्रे यांनी सुत्रसंचालन केले. संग्राम गोडसे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी राजू पावले, कविता देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta