Saturday , July 13 2024
Breaking News

चंदगड पोलिसांकडून २४ तासात खूनाचा उलघडा!

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ते किणी (ता. चंदगड) या रस्त्यालगत अनिरुद्घ अँटो टू व्हीलर गॅरेज समोर फरशीवर प्रविण कृष्णा तरवाळ (वय ४० वर्ष) रा. किणी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर हा दि. १४ जून रोजी सकाळी सात वाजता बेशुद्धावस्थेत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. यानंतर चंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रवीणला दाखल केल्यानंतर मयत घोषीत करण्यात आले. यानंतर या प्रकरणाचा चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर चंदगड पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा राबवत या प्रकरणाचा २४ तासात छडा लावून संशयित आरोपी चंद्रकांत रामू हदगल (वय ४८) सध्या रा. किणी, ता. चंदगड मूळ गाव किणी ता. चंदगड याला खूनाच्या गुन्ह्याखाली अटक केल्याने कोवाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी अंजली प्रविण
तरवाळ व आरोपी चंद्रकांत हदगल हे एकमेकाचे परिचयाचे व ओळखीचे आहेत. यातील मयत प्रविण यांचा मित्र सतिश हन्नुरकर यांचे पत्नी सोबत आरोपी चंद्रकांत यांनी विवाह केल्याचे मनात राग धरुन होता. मयत प्रविण याने त्याला शिवीगाळ व धमकी दिल्याचा राग मनात धरुन व आरोपी हा अनुसुचीत जाती जमाती सदस्य आहे हे माहीत असुन सद्धा आरोपीने मयतास ठार मारले असावे. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार चंदगड पोलीस ठाणे यथे अकस्मात मयत रजि नंबर ३९/२०२२ सी आर पी सी १७४ प्रमाणे दि. १४/०६/२०२२ रोजी दाखल केले केले होते. अकस्मात मयत प्रकरणातील मयत प्रविण कृष्णा तरवाळ (वय ४०) रा. किणी, ता. चंदगड यांचा संयशास्पद मृत्यु प्रकरणी चंदगड पोलीस ठाणेकडुन २४ तपासाचे आत ०१ आरोपीस ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता खुनाचा गुन्हा दिसून आला. यामध्ये गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, गडहिंग्लज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पो. सतपाल कांबळे, पो अंकुश कांरडे, पो. हणमंत नाईक, पो. अर्जुन जाधव, पो. कॉ. रावसाहेब कसेकर, पो.हे.कॉ. संभाजी कोगेकर, पो. ना. रामदास किल्लेदार, पो. ना. सुरेश भदरगे, पो. कॉ. संदीप कांबळे, पो. कॉ. सुर्यकांत सुतार, पो.कॉ. युवराज पाटील, पो.कॉ. अमोल देवकुळे, पो.कॉ. खुशाल शिंदे, पो. कॉ. दत्तात्रय पाटील, पो.कॉ. अमर सायेकर, चालक पो.कॉ. मानगावे चंदगड पोलीस ठाणे या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.
सदर गुन्ह्याचा तपास राजीव नवलें उप विभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज विभाग हे करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू

Spread the love  धुणं धुण्यासाठी गेल्यानंतर काळाचा घाला कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *