बेळगाव : येळ्ळूरमधील मुख्य रस्त्यामार्गे गतिरोधक, सिग्नल फलक बसवणे तसेच येळ्ळूर बेळ्ळारी रस्त्याकडेला टाकलेले घाणीचे ढिगारे हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
खानापुर, गुंजी, नंदीहळ्ळी, राजहंसगड, देसूर, सुळगा या सगळ्या गावातील विटा व वाळू ट्रक टेम्पो व इतर वाहने ये-जा करत असतात त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी प्रमुख बनला आहे. या रस्त्याला जवळपास येळ्ळूरमधील सहा शाळा, हायस्कूल, अंगणवाडी आहेत. यामुळे सकाळ व संध्याकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांची देखील या रस्त्यावर ये-जा करत असतात. यामुळे विद्यार्थ्याना जीव मुठित धरुन जावे लागत आहे. तसेच रोज या रस्त्याला छोटे मोठे अपघात होत आहेत. दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायतने, सहायक कार्यनिर्वाहक अभियंता पी. जी. टोटवी लोकापयोगी इलाखा बेळगाव यांना निवेदनाद्वारे येळ्ळूरच्या मुख्य रस्त्याला महारष्ट्र हायस्कूल, चांगलेश्वरी हायस्कूल, अंगणवाडी क्रमांक 5, मराठी मॉडल स्कूल, प्राथमिक मराठी मॉडल स्कूल येळ्ळूरवाडी व कन्नड शाळा, शिवाजी विद्यालय या ठिकाणी गतिरोधक बनवा, तसेच येळ्ळूर- बेळ्ळारी नाल्या पासून वडगाव पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला ड्रनेज नाल्यातील घान व मातीचे जे ढिगारे रस्त्या शेजारी टाकले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर ते ढिगारे हटवण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या आधी सुद्धा 17/01/2022 रोजी याबद्दलचे निवेदन दिले होते, पण आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामूळे यावेळी याकडे गांभीर्याने लक्ष घालावे असे आवाहन येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आले. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेनसे, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, कल्लापा मेलगे, पीडिओ अरुण नाईक, सेक्रेटरी सदानंद मराठे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta