Sunday , October 27 2024
Breaking News

योग दिनानिमित्त तब्बल 25 तास पाण्यावर तरंगण्याचा उपक्रम

Spread the love

बेळगाव : येत्या 21 जून रोजीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्त शहरातील योगपटू संजीव हंचिनमनी हे 25 तास पाण्यावर तरंगण्याचा थरारक उपक्रम राबविणार आहेत. योगपटू हंचिनमनी हे 20 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 21 जून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत आपला हा उपक्रम करतील.

काहेर -केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च, स्विमर्स क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस स्विमिंग क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. योगपटू संजीव हंचिनमनी हे आपल्या 25 तास पाण्यावर तरंगण्याच्या उपक्रमा दरम्यान दर 4 तासांनी नैसर्गिक विधी आणि न्यूट्रिशनसाठी 10 मिनिटांची विश्रांती घेतील.
त्याचप्रमाणे 24 अन्य जलतरणपटू प्रत्येकी 1 तास याप्रमाणे एका पाठोपाठ एक हंचिनमनी यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी पाण्यावर तरंगणार आहेत. त्याच प्रमाणे अन्य 25 वेगवेगळ्या वयोगटाचे जलतरणपटू तंदुरुस्तीचे प्रतीक म्हणून प्रत्येकी 1 तास याप्रमाणे एकानंतर एक असे जलतरण करतील.
याव्यतिरिक्त कांही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिव्यांग जलतरणपटू देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत. एकंदर संजीव हंचिनमनी यांना प्रोत्साहन व पाठिंबा देण्यासाठी एकूण 75 जलतरणपटुंचा या उपक्रमात सहभाग असणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आजादी का अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबविला जाणार आहे. उपक्रमाची सांगता मंगळवारी 21 जून रोजी सायंकाळी दिमाखदार सोहळ्याने होणार आहे. तरी जलतरणासह क्रीडाप्रेमींनी या थरारक उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोणत्याही परिस्थितीत काळ्या दिनाची सायकल फेरी काढणारच; पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत समिती नेत्यांचा निर्धार

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *