बेळगाव : आगामी काळात स्टार एअर लाईन्स बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी दिली.
बेळगावातील क्लब रोडवरील रेमंड्स शोरूमला शुक्रवारी सायंकाळी स्टार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन संजय घोडावत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शॉपिंग करून विविध व्हरायटीचे, डिझाईन्सचे आपल्या आवडीचे कपडे खरेदी केले. याप्रसंगी रेमंड्स शोरुमचे संचालक सुरेश पोरवाल आणि विजय पोरवाल यांनी संजय घोडावत यांचे आपुलकीने स्वागत केले.
याभेटीप्रसंगी बोलताना संजय घोडावत म्हणाले, बेळगाव आणि संजय घोडावत ग्रुपचे जुने, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विविध क्षेत्रात प्रगती केलेल्या संजय घोडावत उद्योग समूहाने आता विमान प्रवास क्षेत्रातही झेप घेतली आहे. स्टार एअरलाईन्सच्या माध्यमातून आता 77 आसनी विमानसेवा सुरु केली आहे. आता बेळगावातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा मानस आहे. लवकरच संजय घोडावत उद्योग समूह ही सेवा सुरु करणार आहे. स्टार एअरलाईन्सने यशस्वीरीत्या स्थापनेची 5 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. समूहाच्या लोकल मार्केट योजनेलाही लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे लवकरच देशभरात 3 हजार नव्या दुकानांचा प्रारंभ करण्यात येणार आहे, असे संजय घोडावत यांनी सांगितले.
यावेळी रेमंड्स शोरुमचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …