
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली 27 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची जनजागृती उचगाव येथील मध्यवर्ती गणेश मंदिरात करण्यात आली. यावेळी या मोर्चाला गावातील नागरिकांनी बहुसंख्येने हजर राहावे व मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी केले.
मराठी भाषिकांनी आपल्या मराठी भाषेवरील अन्याय दूर करण्यासाठी एकत्रपणे लढावे मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी केले.
यावेळी उचगाव गावातील नागरिकानी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचा पाठिंबा दर्शविला.
समितीचे प्रकाश मरगाळे, एम. जी. पाटील, शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, बाळासाहेब देसाई, दत्ता उघाडे, एल. वाय. लाळगे, आणि समितीनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta