Tuesday , March 3 2026
Breaking News

मंगाई देवीचा गाऱ्हाणे कार्यक्रम 24 जूनला

Spread the love

बेळगाव : वडगावची ग्रामदेवता “श्री मंगाई देवी” ही शेतकऱ्यांची देवी म्हणून ओळखली जाते. बेळगाव परिसरात जागृत नवसाला पावणारी देवी म्हणून मंगाई देवी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली मंगाई देवी यात्रा 26 जुलै रोजी होणार आहे.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या मंगाई देवी यात्रेच्या सुरवातीला देवीला गाऱ्हाणे घालून वार पाळण्याची प्रथा आहे. नवसाला पावणाऱ्या मंगाई देवीची यात्रा यावर्षी जोरात होणारही. यावर्षीची मंगाई यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय पंच कमिटीने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात मुख्य पुजारी व पंच कमिटीच्या उपस्थितीत यात्रेच्या धार्मिक विधी पार पडली होते. भाविकांना देवदर्शन बंदी होती. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावट निवळल्यामुळे जत्रा जोरात होणार आहे.
26 जुलै रोजी होणाऱ्या यात्रेसाठी 24 जून रोजी रात्री मंदिर पुजारी व मानकऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत गाऱ्हाणे घालण्यात येणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *