Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग दिवस कार्यक्रमाची सुरुवात राजेश कणगली, सौ. श्रीदेवी राजेश कणगली यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. योगशिक्षक परशुराम कुरबेटी, पुष्पराज माने, सौ. शिवलीला कुंभार, सौ. शैलाजा जेरे यांनी योग साधनेचे महत्व व त्याचे लाभ साधकांना समजावून सांगितले. नुकतेच हरिद्वार येथून योगगुरू रामदेवबाबा यांचा आशीर्वाद घेऊन आलेले संकेश्वर पतंजली योग समितीचे राजू इंडी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमिला देसाई, गीता काकडे विजयालक्ष्मी भागवत, हेमा इंडी, सुरेखा शेंडगे, श्रीनिवास कोळेकर, नागराज नाईक, शिवानंद सारवाडी, सुनील पत्रेमठ, रावसाहेब कंबळकर, गजानन नाईक, सचिन सपाटे, योग साधक उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद सारवाडी यांनी केले. आभार पुष्पराज माने यांनी मानले. यावेळी योग शिक्षक परशुराम कुरबेट पुष्पराज माने यांनी सर्वांना योग करा निरोगी रहा असा संदेश दिला. पतंजली योग समितीच्या योगशिक्षकांनी हिरण्यकेशी शिक्षण संस्था संचलित विद्यानिकेतन शाळेत, निडसोसी सीबीएसई स्कूल, कन्नड माध्यम शाळा, एसजेपीएन महाविद्यालय, अक्कमहादेवी कन्या शाळेत योग-प्राणायमाच्या सरावाने योग दिवस उत्साही वातावरणात साजरा केला.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *