बेळगाव : बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या पाटील मळा येथील एका युवकाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
वन खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश गुरव (रा. तांगडी गल्ली, बेळगाव) असे वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नांव आहे. सदर युवका सोबत चार पोपट आणि एक पिंजरा देखील जप्त करण्यात आला आहे.
पाटील मळा परिसरामध्ये बंदी असलेल्या पोपटांची विक्री करणाऱ्या आकाश याला रंगेहात पकडून देण्यात एक्वेरियम चालकाचे सहकार्य लाभले.
आकाश गुरव हा पाटील मळा परिसरात बंदी असलेल्या पोपटांची विक्री करत असल्याची माहिती संबंधित एक्वेरियम चालकाकडून मिळताच वन अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दाखल होऊन आकाशला रंगेहात पकडले.
या प्रकरणी बेळगाव वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर पोपट विक्रेत्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. भारतीय मूळ पोपटांची विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta