बेळगाव : “सहकार क्षेत्रात अनेक अडचणी असल्या तरीही रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आज या संस्थेच्या चार शाखा कार्यरत असल्या तरीही नजीकच्या काळात या संस्थेने अधिकाधिक शाखा काढाव्यात त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडल्यासारखे होईल” असे विचार बेळगावचे एसीपी क्राईम श्री. एन. व्ही. बरमनी यांनी बोलताना व्यक्त केले .
येथील मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नेहरूनगर शाखेचे स्थलांतर शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले त्यावेळेला श्री बरमनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते फीत सोडून आणि दीप प्रज्वलित करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
अनंत लाड यांच्या प्रास्ताविकानंतर संस्थेचे चेअरमन संजय मोरे यांनी स्वागत करून पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला . सोसायटीने गेल्या बावीस वर्षात केलेल्या कार्याचा आढावा श्री. संजय मोरे यांनी घेतला. “समाज उपयोगी उपक्रम राबविणारी आमची बेळगाव येथील पहिली संस्था असून नजीकच्या काळात सभासदांच्या हिताचे अनेक कार्यक्रम आम्ही राबविणार आहोत असे त्यांनी सांगितले रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या संस्थेच्या यशात आपल्या संचालकासह कर्मचारी, ठेवीदार व कर्जदार यांचा महत्त्वाचा वाटा आहे,” असे ते म्हणाले.
“संस्थेची सध्या एकच शाखा स्वतःच्या मालकीच्या जागीच असून नजीकच्या काळात बाकीच्या चार शाखा स्वतःच्या जागेत स्थलांतरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असेही मोरे यांनी सांगितले. माधुरी खटावकर, शाखा व्यवस्थापक यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश ओझा, संचालिका शारदा सावंत, संचालक प्रसन्ना रेवणावर, जयपाल ठकाई, सदाशिव कोळी, किशोर भोसले, राजेंद्र अडकुरकर, मयूर सुळगेकर व सरिता कणबरकर यांच्यासह विराज भातखंडे, अपर्णा पाटील, अतुल कपिलेश्वरी, प्रकाश कालकुंद्रीकर, विकास कलघटगी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …